सुभाष घोडके यांच्या एकसष्टीमुळे गावातील ज्येष्ठांची अमृत महोत्सवी साजरी::हानुमंत मडके

कळंब/जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील ७७ ज्येष्ठ नागरिकांची अमृत महोत्सवी साजरी करण्याचा योग संपादक सुभाष घोडके यांच्या एकसष्टीमुळेच घडून आला असून ऐतिहासिक आणि इतर गावानी आदर्श घेण्यासारखा शानदार सोहळा संपन्न झाला असल्याचे प्रतिपादन मोहकर उद्योग समूहाचे चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांनी केले.
प्रबूध्द रंगभूमी बहुउद्देशिय संस्था,कळंब आयोजित अधिस्वीकृतीधारक संपादक सुभाष घोडके यांच्या एकसष्टीनिमित्त पिंपळगाव (डोळा) बहुजन अमृत महोत्सवी सोहळा माजी सरपंच सुखदेव (नाना) टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता शानदार संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर उद्योग समूहाचे चेअरमन हनुमंत (तात्या) मडके,ज्येष्ठ नागरीक संघाचे मराठवाडा अध्यक्ष डी.के.कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज आडसूळ, अंगणवाडी पर्यवेक्षीका ताई बोराडे, पोलीस मित्र असोसिएशनचे सचिव संत सुफी सय्यद,ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे, प्रकाश भडंगे,संपादक सुभाष घोडके,इंजि. प्रकाश धस,इंजि.शंकर यादव,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे आदींनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात पंचाहत्तर वर्षे वय झालेल्या ५० ज्येष्ठ नागरिकांचा शाल,श्रीफळ,हार,गुलाब पुष्प,विशेषांक देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ज्या सत्कारमूर्तीचे वयोवृद्धावस्थेमुळे कार्यक्रम स्थळी हजर होणे अशक्य होते अशा सत्तावीस ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार त्यांच्या घरी जावून करण्यात आला.
या कार्यक्रमात सुभाष घोडके लिखित सत्य घटनेवर आधारित साक्षी नावाची कादंबरी,अमृत महोत्सवीवर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीबा ज्योतिबा फुले,राजश्री शाहु महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार माधावसिंग राजपूत यांनी केले तर आभार बंडू ताटे आणि सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष महादेव (आबा) टेकाळे, संयोजन समिती अध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज आडसुळ,सचिव माधवसिंग राजपूत,कार्याध्यक्ष बंडू ताटे,सदस्य राजेंद्र बारगुले,महेश फाटक, परमेश्वर खडबडे, राजाभाऊ पांचाळ, मधुकर सरवदे,राजेंद्र कांबळे,नवनाथ जगताप, सुखदेव टेकाळे,तुकाराम धस,मधुकर बारगुले, अनिल टेकाळे,बिभीषण सोमासे,लहू कावळे, बाळासाहेब पवार,मधुकर टेकाळे,सोमनाथ गुजर,विक्रम धस,संतोष टेकाळे,चंद्रकांत पाटील,पांडुरंग दत्त,वैभव टेकाळे, राजाभाऊ दशवंत,सागर घोडके,राकेश घोडके,विष्णू घोडके आदींनी परिश्रम घेतले.