ताज्या घडामोडी

येरमाळ्यात अयोध्यातुन आलेल्या अक्षता कलशाची उत्साहात शोभायात्रा

अयोध्येतील भव्य मंदिरात श्री प्रभू रामचंद्राच्या मृर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असुन यानिमित्ताने अयोध्यातून आलेल्या अक्षता कलशाची येरमाळा गावातून उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. येथील लहान मुलां-मुलींसह अनेक महिलांनी या अक्षता कलशाच्या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. यावेळी जय श्रीरामाच्या जयघोषाने येरमाळानगरी दुमदुमुन गेली होती. या अक्षता कलशाच्या शोभायात्रेमध्ये शेकडो श्रीरामभक्तांच्या सहभागाने गावामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

येरमाळा येथील रोकडोबा हनुमान मंदिररात महाआरती आणि मंगल कलशाचे पूजन कारसेवक चंद्रकांत बारकुल, विकास बारकुल यांच्या हस्ते करण्यात येऊन शोभयात्रेची सुरुवात करण्यात आली. यादरम्यान पालखी मध्ये प्रभु राम व आई येडेश्वरी देविच्या प्रतिमा पुजन करुन अक्षता कलश ठेवण्यात येऊन गावातील ग्रामदैवतांना वाढवत ग्रामदैवतांना निमत्रंण देण्यात आले.
यावेळी सुखानंद जंगम, विजय देशमुख, समाधान बेदरे, पवन पंडीत, समाधान बारकुल, बंडुनाना बारकुल, दशरथ जाधव, सोमनाथ बारकुल, दत्ता बारकुल, जंगम, नितिश राऊत, सचिन बारकुल, दत्ता कस्पटे, प्रथमेश शिंदे, अनिकेत कवडे, औंकार जोशी, संदीप बारकुल, रोहीत घेवारे, उमेश गायके, समाधान बारकुल, यांच्यासह राम भक्त, बजरंग दलाचे सेवक, महीला व पुरुष भजनी मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.