ताज्या घडामोडी

खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शिराढोण येथे 5 कोटींच्या विकास कामाचे लोकार्पण, भूमिपूजन व उदघाटन

शेकडो कार्यकर्त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश

जयनारायण दरक/ कळंब

कळंब तालुक्यातील शिराढोण येथे दि.19 रोजीखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या निधीतून तसेच आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून व अन्य योजनांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच कार्यरत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शिराढोण गावात शाळा, मंदिर, दर्गा, समशानभूमी संरक्षण भिंत, काशिनाथ महाराज मठ, आरोग्य केंद्र, मंदिर सभामंडप, दलित वस्तीतील सभागृह, देवधानोरा- इकुरगा-जायफळ रस्ता तसेच कोल्हेगाव-शिराढोण-आवाडशिरपूरा रस्ता अशा विविध कामांच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातूनच काही विकासकामे मार्गी लागली असून काही पूर्णत्वास जात आहेत.या व्यतिरिक्त इतरही बऱ्याच कामांना मंजुरी मिळाली असून ती कामे प्रत्यक्ष सुरु होण्याच्या मार्गांवर आहेत.
गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून, यापुढेही विविध योजनेतून निधी उपलब्ध करुन गावाचा आर्थिक, सामाजिक व व्यापारवाढ यासाठी कायम साथ देणार असल्याचे खासदार व आमदार यांनी जाहीर सभे द्वारे गावकऱ्यांना संबोधित केले.
याप्रसंगी धाराशिव चे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, जिल्हा संघटक प्रा. दिलीप पाटील, उप जिल्हा प्रमुख प्रदीप मेटे, मा जि. प. सदस्य बालाजी जाधवर, मा.पं .स.सदस्य राजेश्वर पाटील, उत्कर्ष संगवे , मा. प. स. सभापती रामलिंग आव्हाड, सलीम उर्फ सैलानी बागवान, नासेर पठाण,बाजार समिती सदस्य हनुमंत आवाड, संजय होळे, सुधाकर टेळे, रफिक कुरेशी,अशोक उर्फ सोनू यादव, दिलीप पांनढवळे, धनंजय माने, श्रीकांत भिसे, सचिन कापसे, राजाभाऊ आगरकर, संदीप पालकर, हनुमंत पाटील, मनोहर धोंगडे, विश्वजीत जाधव, गोविंद चौधरी, अतुल पवार, अजित घोगरे, महादेव मगर,पृथ्वीराज लोमटे , श्रीपाद कापसे, अवधूत पाटील, आयुब कुरेशी, अमोल पाटील, निलेश नाईकवाडे , किरण सहाने, विक्रम नाईकवाडे , राजाभाऊ खडबडे , दगडू पाटील, जगदीश राठोड, भरतराजे शिंदे, प्रज्योत माने आदिंसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

:यांचा झाला जाहीर पक्ष प्रवेश :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात खासदार व आमदार यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश घेतला. यामध्ये ऍड. नितीन पाटील, सिकंदर कुरेशी, सलमाम बडे, पाशा पठाण, मंजूर कुरेशी, शौकत शेख, बिलाल पठाण यांच्या सह या गटातील शेकडो कार्यकर्त्यांणी पक्ष प्रवेश केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.