येरमाळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंदाकिनी आबासाहेब बारकुल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड

येरमाळा येथील ग्राम पंचायत सरपंचपदी मंदाकिनी आबासाहेब बारकुल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.येथील ग्रामपंचायत वर भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निकट वर्तिय म्हणून ओळख असलेले माजी पंचायत समिती सभापती विकास बारकुल याचे गेल्या वीस वर्षांपासून एक हाती वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळवले आहे.गेल्या निवडणुकीत ही त्यांनी शिवसेना,राष्ट्रवादी पॅनलचा दारुण पराभव केला होता.
गेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत खुल्या महिला प्रवर्गाला आरक्षण होते.निवडणुकीत भाजपाचे विकास बारकुल यांच्या गटाने विरोधी शिवसेना,राष्ट्रवादी पॅनल विरुद्ध १३/ ० अशी एकहाती निवडणूक जिंकली होती.निवडून आलेल्या खुल्या प्रवर्गातील चार महिलांना सव्वा सव्वा वर्षे सरपंच पद देण्याचे विकास बारकुल यांनी जाहीर केले होते.त्या नुसार तिसऱ्या क्रमांकाच्या महिला सरपंचपदी मंदाकिनी आबासाहेब बारकुल यांची नव्याने सरपंचपदी निवड करण्यात आली.पाहिले सव्वा वर्ष मुस्लिम महिला सरपंचपद तबसुंम सय्यद यांना तर दुसऱ्या वेळी सुजाता श्रीकांत देशमुख,यांना तर तिसऱ्या वेळी मंदाकिनी आबासाहेब बारकुल बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या निवड प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी डी.एम.कांबळे यांनी पाहिले तर सहकारी म्हणून तलाठी साधना गायकवाड कोतवाल संजय पवार यांनी काम पाहिले.