मकर संक्रातीच्या निमित्ताने महिलांसाठीचा खेळ पैठणीचा खेळात अनुजा सुर्यकांत लोमटे यांनी जिंकली पैठणी

येरमाळा -मलकापूर ता. कळंब येथे राजमाता जिजाऊ जयंती आणि मकर संक्रातीच्या निमीत्ताने जि.प . शाळेत महिलांसाठीचा खेळ पैठणी चा आणि तिळ गुळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली . मलकापूर जि.प . शाळेतील सहशिक्षिका . अनपट अश्विनी च्या पुढाकाराने मलकापूर येथील महिलांसाठी हळदीकुंकू आणि तिळ गुळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्याच बरोबर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, लिंबु चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या . या सर्व स्पर्धेमध्ये जवळपास 100 महिलांनी सहभाग नोंदवला . रांगोळी स्पर्धे मध्ये . पुजा लोमटे,. प्रियंका लोमटे अश्विनी लोमटे यांनी बक्षिसे मिळवली तर लिंबू चमचा स्पर्धे मध्ये पुजा लोमटे,.प्रांजली वणवे, चंद्रकला वणवे यांना बक्षिसे मिळाली . आणि संगीत खुर्ची मध्ये आशा वणवे यांनी विजय मिळविला . तर मानाची पैठणी मिळविण्याचा मान अनुजा सुर्यकांत लोमटे यांना मिळाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षिका अनपट मॅडम यांनी केले तर निरीक्षक म्हणून रसाळ मॅडम यांनी काम पाहीले .
यावेळी सरपंच.रुक्मिणी घोळवे, माजी सरपंच.वणवे यांच्यासह बचत गटातील महिलानी या स्पर्धेत भाग घेऊन खेळाचा आनंद घेतला .