ताज्या घडामोडी

बजरंग ताटे माया शिंदे यांचा निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांच्या वतीने केला सन्मान

 

जयनारायण दरक/कळंब (प्रतिनिधी)

कळंब येथे श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे व मानवी हक्क अभियान च्या जिल्हाध्यक्षा सौ माया शिंदे यांचा भारत निवडणूक आयोग,जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2024 निमित्त डॉ. सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी धाराशिव यांच्या वतीने संजय पाटील उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. भटक्या विमुक्त, पारधी,आदिवासी, अल्पसंख्यांक समाजामध्ये भाई बजरंग ताटे व माया शिंदे (अध्यक्ष सचिव) लोकहित सामाजिक विकास संस्था व श्रमिक मानवाधिकार संघ यांनी लोकशाहीत स्थापन होणाऱ्या शासनात भारत देशातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग असावा यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकास मत देण्याचा अमुल्य अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. छायाचित्र सह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरनिरीक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत भाई बजरंग ताटे माया शिंदे लोकहित सामाजिक विकास संस्था व श्रमिक मानवाधिकार संघाच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जाती व पारधी आदिवासी अल्पसंख्यांक समाजातील वस्ती, तांड्यावर, पाड्यावर मतदार नोंदणी केली. राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन लोकशाहीला बलशाली बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल भाई बजरंग ताटे व माया शिंदे लोकहित सामाजिक विकास संस्था व श्रमिक मानवाधिकार संघ यांना संजय पाटील उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कळंब तालुक्याचे तहसीलदार मनीषा मेने, नायब तहसीलदार गोपाळ तापडिया, मुस्तफा खोंदे, खलील, मंडळ आधिकारी तुळशीराम मटके, एस.एस.पाचभाई, खलिल शेख व 16 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व ज्ञान प्रसारक मंडळाचे प्राचार्य सुनील पवार हे उपस्थित होते. सन्मानित केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून माया शिंदे व भाई बजरंग ताटे यांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.