येरमाळा येथे दलित हॉटेल चालकास जबर मारहाण अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

. दि.24 जानेवारी 2024 रोजी रात्री. 8.30 च्या सुमारास गोविंद नवनाथ पौळ ( रा. येरमाळा हॉटेल चालक) हे आपल्या हॉटेल समर्थ कडे जात असताना बस स्थानक येरमाळा समोरील हॉटेल आशीर्वाद समोरील रस्ता क्रॉस करत आसताना, आरोपी नामे – अविश्कार ज्ञानेश्वर बारकुल (रा. येरमाळा) त्याचा मोटर सायकल ने जोरात क्रॉस करून गोविंद पौळ याना,” तु माझ्या मोटर सायकलीस समोर कसा काय आलास चांभरड्या तु लई माजला आहेस तुला बघतो ” आसे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करून दगडाने, लाथा बुक्यानी व हातातील लोखडी कडयाने मारहाण करण्यास सुरुवात केली आसता, 5 यावेळीस भांडण सोडविण्यासाठी आलेल्या, गोविंद पौळ याच्या वडीलास – नामेः नवनाथ भगवान पौळ व भाऊ नामेः बालजी नवनाथ पौळ याना ही आरोपी : अविश्कार ज्ञानेश्वर बारकुल व – त्याचा मित्र प्रविण हनुमंत बारकुल, यांनी जातीवाचक शिवीगाळ करत चाभारड्यानो तुम्हाला बघतो आसे म्हणत दगडाने, लाथाबुक्क्यांनी व हातातील लोखडी कड्याने डोक्यावर व तोडावर
मारले या मारहाणी मध्ये, गोविद पौळ व त्याचे वडील नवनाथ पौळ यांचा डोक्याला व तोडाला जबर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे हालवण्यात आले आहे. गोविंद नवनाथ पौळ यांनी येरमाळा पोलिस स्टेशन येथे, अविष्कार ज्ञानेश्वर बारकुल व प्रविण हनुमत बारकुल रा. येरमाळा ता. कळंब याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असुन वरील आरोपी विरुद्ध. भा.द.वि..324,504,506,34 अनुसुचीत जाती जमाती आत्याचार प्रतिबंधक- का.3(1)( r),3(1)( S) अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास कळंब पोलिस उपअधीक्षक हे करीत आहेत.