ताज्या घडामोडी
कळंब शहरात भा.ज.पा.चे गाव चलो अभियान.

भा. ज. पा. चे गाव चलो अभियान सुरू असून कळंब येथे गाव चलो अभियान अंतर्गत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले राष्ट्रीय कबड्डी कोच व जिल्हा कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष लक्षमण मोहिते तात्या यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार करुन त्याना मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती शासनाच्या योजनेची माहिती दिली तसेच कॉग्रेस चे मा. ता. सरचिटणीस बाळासाहेब शेळके यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली व कळंब शहरातील अनेक मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या सध्या जिल्ह्यामध्ये भा. ज. पा. चे गाव चलो अभियान चालू असुन भा. ज. प. जि. उपाध्यक्ष संजय घोगरे यांच्या कडे कळंब शहराची जबाबदारी दिली आहे म्हणून काल त्यानी कळंब शहरात अभियान सुरू केले आहे