ताज्या घडामोडी

येरमाळा येथे शिवजन्मोत्सव सोहळा 2024 ची अध्यक्ष, उपाध्यक्षासह कार्यकारिणी जाहीर  

येरमाळा प्रतिनिधी-
येरमाळा येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी खंडोबा मंदिर येथे मीटिंग घेऊन कार्यकारणी नेमण्यात आली. शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष म्हणून देवानंद गणपत बारकुल उपाध्यक्ष म्हणून शुभम सुरेश बारकुल व ओम तानाजी शिंदे सचिव म्हणून अमोल रामकृष्ण बारकुल, लहू तुकाराम बारकुल, बालाजी शंकर बारकुल, प्रितेश पंडित बारकुल संघटक म्हणून गणेश रमेश पवार, सचिन सतिष पाटील व रोहित रमेश घेवारे अशा प्रकारच्या निवडी सर्वानुमते झाल्या तसेच गावातील इतर युवक, नागरिक उपस्थित होते तसेच गावातील सर्व ज्येष्ठ व युवकानी 2024 शिवजन्मोत्सवासाठी अग्रेसर पणे भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणात उत्साहात सर्वसामावेशक शिवजयंती महोत्सव पुढील कार्यक्रम घेऊन करण्याचे ठरले येरमाळा गावातील व परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की शिवजन्मोत्सव 2024 साठी पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
1) गावातील मुख्य रस्त्याला भगवे ध्वज भगव्या कमानी.
2) गावातील मुख्य दोन ठिकाणी शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना.
3) 19 फेब्रुवारी रोजी सकाळी भव्य पालखी मिरवणूक उपस्थित सर्व शिवप्रेमींना फेटा बांधण्याचे नियोजन व उत्साहात पालखी मिरवणूक.
4) 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी भव्य पाळणा महोत्सव उपस्थित गावातील सर्व महिला व विद्यार्थिनी.
5) भव्य व्याख्यान कार्यक्रम व बक्षीस वितरण
6) छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक.
7) 394 व्या जयंतीनिमित्त जून मध्ये 394 वृक्षारोपण करण्याचे नियोजन अशा विविध कार्यक्रमाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येरमाळा येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव 2024 साजरा करत आहोत. शिवजन्मोत्सव 2024 च्या जमलेल्या वर्गणीतून सर्व कार्यक्रम होऊन उर्वरित रकमेतून बाजार चौक येथे पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवून गावात येणाऱ्या  वारकऱ्यांचे तसेच आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांतून शिवजन्मोत्सव कार्य समितीचे कौतुक होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.