येडाई व्यसनमुक्ती केंद्रात पुस्तक वाचनाने बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

तेरणा काठ वृत्तसेवा — येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येरमाळा येथे व्यसनमुक्तीचा उपचार घेण्यासाठी दाखल झालेले रुग्ण व कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुस्तक वाचून जयंती साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्व व्यसनाधीन व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतली की आज दिवसभर आपण झेप व्यसनमुक्तीची या पुस्तकाचे वाचन करून नवीन ज्ञान आत्मसात करून व्यसनरूपी दुश्मनाला हरवून नवीन दिशा निश्चित करू. असे म्हणून झेप व्यसनमुक्तीची हे पुस्तक वाचून एक आगळी वेगळी जयंती साजरी केली
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉक्टर पल्लवी तांबारे या होत्या त्यांनी या कार्यक्रमात शिक्षण व संस्कारचे महत्त्व सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राच्या कौटुंबिक सामूपदेशिका प्रियंका शिंदे यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणपतसिंग परदेशी मॅनेजर बापूराव हुलुळे कल्पना कोठावळे सुरज जाधव युवराज पडवळ यांनी परिश्रम घेतले