ताज्या घडामोडी

कळंब तालुका पत्रकार मंडळाच्या पुरस्काराचे मानकरी आनंद बलाई व सतपाल बनसोडे

कळंब /जयनारायण दरक-

कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज कार्यगौरव पुरस्कार यावर्षी सामाजिक कार्यकर्ते आनंद बलाई यांना तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सतपाल बनसोडे यांना जाहीर करण्यात आला आहे. लवकरच एका कार्यक्रमात हे दोन्हीही पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे, उपाध्यक्ष पार्श्वनाथ बाळापुरे, सचिव भिकाजी जाधव यांनी सांगितले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.