ताज्या घडामोडी
कळंब मधील शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्याचा भाजपामध्ये प्रवेश

कळंब/ जयनारायण दरक—–
कळंब येथील उबाठा सेनेला खिंडार पडले असून शिवसेनेचे कार्यकर्ते हर्षद अंबूरे, माजी नगरसेवक सुनील (भाऊ) गायकवाड, प्रमोद ताटे, किशोर वाघमारे, लखन गायकवाड, अँड शकुंतला ताई फाटक यांचा धाराशिव येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी कळंब तालुका भाजपाध्यक्ष अजित पिंगळे, माणिक गोंधळ व भाजपा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या पुढील काळातील अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची चर्चा यावेळी एकावायस येत होती .