ताज्या घडामोडी

येरमाळ्याच्या येडाईची जत्रा बैलगाडीचीचं::  मोटार गाडीच्या गर्दीत बैलगाडीतून येणाऱ्या भाविकांचा आनंद काही औरच 

येरमाळा श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सोमवार पहिल्या पौर्णिमेपासूनच पासून प्रारंभ झाला आहे .यात्रेसाठी लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले आहेत  पूर्वी भाविक हे बैलगाडी सजवून बैलगाडीतूनच यात्रेसाठी येत असत परंतु या मोटर गाडीच्या दुनियेत आजही काही भाविक बैलगाडीतून आल्याचे दृश्य पाहावयास मिळाले

.यात्रेचा मुख्य कार्यक्रम चुना वेचण्याचा कार्यक्रमास  भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते  चैत्र पौर्णिमे निमित्त मंदिरात देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून भाविकांनी दर्शन घेतले मिळेल त्या वाहनाने भाविक येरमाळा नगरीकडे दाखल होत आहेत यातही पूर्व परंपरेनुसार चालत आलेल्या बैलगाडी तून भाविक  येत असल्याचे दुर्मिळ चित्रही पाहवयास मिळत आहे बैलगाडीची जत्रा हा आनंद काही भाविक घेताना दिसतात .येरमाळ्याच्या शिवारात, रस्त्याकडेला,शेतात झाडाखाली भाविकांनी जागा दिसेल तिथे राहुट्या मारल्या आहेत.झाडाचा आधार घेत अनेकांनी सावल्या शोधल्या असून विशेष दोन दिवसांचा मुक्कामाची तयारी केली आहे.गेल्या आठवडा भपासून उष्णतेची लाट असल्याने आजही उन्हाचा पारा ३८ अंशावर असूनही भाविक देवीच्या श्रद्धेपोटी उन्हाची पर्वा न करता देवीच्या भक्तिरसात गुंग झाल्याचे चित्र येडेश्वरी मंदिर परिसरात दिसतं होते. मंदिराच्या चोही बाजुला दिसेल तिथं पर्यंत भाविकांची गर्दी दिसत होती.

चैत्र पोर्णिमा यात्रेला रब्बी हंगामातील गहू,ज्वारी,हरभरा नवीन आलेल्या धान्याचा देवीला पुरणपोळीचा मान आहे,तर आमराईत पालखीला वड्या,भाकरीचा नेवैद्यचा मान आहे. आज पोर्णिचा नेवैद्य करण्यासाठी तीन दगडाची चूल मांडून नेवैद्य केला तो देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी भावकांची धावपळ सुरू होती पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवल्यानंतर सर्व भाविक आराध्याच्या गीतात रंगून गेले संबळ, जहाजाच्या, ढोलकीच्या ,हलगीच्या , तालावर आराधी गाण्यावर भाविकांना ठेका धराला होता.या आनंद उत्सवाचे चित्र डोळे भरुन पाहण्यासाठी कांही भाविकांनी गर्दी केल्याचे दिसत होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.