ताज्या घडामोडी

कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंबाखू विरोधी दिन तंबाखू विरोधी शपथ

कळंब:- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंबाखू विरोधी दिन तंबाखू विरोधी शपथ घेऊन साजरा.
कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज दि .30 रोजी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत तंबाखू विरोधी दिन तंबाखू न खाण्याची शपथ घेऊन संस्थेतील कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांची मुख आरोग्य तपासणी करून साजरा करण्यात आला यावेळी कळंब उपजिल्हा रुग्णालय कळंबचे दंत चिकित्सक डॉ. दिपक पेठे व एनएसडी समुपदेशक डॉ तानाजी कदम यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करून मुख आरोग्य तपासणी केली.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य के जे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी शामकांत डोंगे, वरिष्ठ लिपिक विलास सुरवसे, भांडारपाल बाजीराव राऊत,शिल्पनिदेशक अतुल वाघमारे, अंकुश माळकर, सुजित दंडणाईक‌, वसंत टोपे, कुटवाड एस एस, कल्लेश भोसले,मंचक जाधव , बालाजी पांचाळ, नदीम शेख ,शिल्पनिदेशिका कल्पना जाधवर , ज्योती शिंदे, कोमल मेंडके, कल्याणी भराटे त्याच बरोबर चतुर्थ वर्ग कर्मचारी पप्पू मडके, फरजाना शेख, रवींद्र जेटीथोर आदींनी परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.