ताज्या घडामोडी

कळंब पोलीस ठाणे च्या मोकळ्या जागेत होणार ऑक्सीजन हब वॉकिंग ट्रॅक

कळंब. निसर्ग प्रेमी वृक्ष लागवडीचे खुप आवड असलेले वृक्षांमधील विविध जातीचे अभ्यासु पोलीस अधीक्षक अतुल जी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून कळंब पोलिस ठाणे च्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत’अटल घन वन’ योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लागवडीकरिता जमीन तयार करण्याचे काम चालू आहे. या जागेवर सहा हजार देसी वृक्ष घन पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे लवकर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व विभागीय सामाजिक वनीकरण अधिकारी करे साहेब धाराशिव यांच्या हस्ते वृक्ष लागवड लवकर करण्यात येणार आहे या मोकळ्या जागेवर ऑक्सीजन हब वॉकिंग ट्रॅक ओपन जिम सुरू करण्यात येणार असून यामध्ये सामाजिक वनीकरण व पोलीस विभागाची कर्मचारी सहभाग असणार आहे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वृक्षप्रेमी निरीक्षक रवी सानप व कळंब सामाजिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या देखरेखीखाली वृक्ष लागवड करण्यात येणार आहे यामुळे कळंबकर यांना ऑक्सीजन हब व ॉकिंग ट्रॅक ओपन जिम याचा फायदा होणार आहे सध्या जमीन तयार करण्याचे काम चालू आहे यावेळी कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस वृक्षप्रेमी पोलीस निरीक्षक रवी सानप, सामाजिक वनीकरण विभाग कळंब चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके त्या विभागाचे वनपाल एस आर कुलकर्णी , संतोष टोणगे कर्मचारी व पोलिसा आमलदार शिवाजी राऊत , महादेव मुंडे, दत्तात्रय शिंदे, विजय मानखुळे महिला पोलीस कर्मचारी स्वाती कांबळे, संजीवनी वरडकर, कल्पना पत्तेवर हे कर्मचारी उपस्थित होते. व लवकरच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व विभागीय सामाजिक वनीकर अधिकारी करे साहेब यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचे उद्घाटन होणार आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.