ताज्या घडामोडी
येरमाळा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रहार दिव्यांग जनआंदोलन शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

येरमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये येरमाळा येथील प्रहार दिव्यांग जन आंदोलन शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वह्या,पेन, पेन्सिल,खोडरबर अदी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी येरमाळा शाखाप्रमुख मारुती वाघमारे सदस्य किरण बारकुल,गोपाळ कोकाटे, बाळासाहेब बारकुल,दत्ता मनगिरे,राजेश बारस्कर, भगवान जाधव,रवी बारस्कर, सचिन बारकुल यांच्यासह दिव्यांग बांधव ,शिक्षक वर्ग उपस्थित होते