ताज्या घडामोडी

जगदंबा कन्या प्रशालेत कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्याना गणवेशाचे वाटप

तेरणा काठ न्युज/खामसवाडी

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जगदंबा कन्या प्रशालेत मागील दहा ते पंधरा वर्षापासुन इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना कर्मचारी सामाजिक बांधिलकी म्हणुन स्वखर्चाने दरवर्षी शाळेचा गणवेशाचे वाटप करतात. यावर्षी शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व मुलां मुलींना दि. १० जुलै२०२४रोजी नवीन गणवेश खरेदी करून वाटप करण्यात आले. सदरील गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमधुन समाधान व आनंद व्यक्त होत आहे. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम आर सावंत , सर्व शिक्षक सुनिल पाटील, अंनत काळे, अंनत गर्जे , बी.डी शिंदे , केद्रे जे व्ही, आर. एन. शेळके, एस. एच. डिकले या वेळी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.