पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि महेश क्षिरसागर यांच्या हस्ते प्रकाशन

तेरणा काठ न्युज
कळंब तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संघाच्या विविध मागण्यासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रेचा आयोजन करण्यात आले आहे.
या पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे प्रकाशन येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि महेश क्षिरसागर यांच्या हस्ते (ता. २७) करण्यात आले.संवाद यात्रा तीन ऑगस्ट रोजी येरमाळा येथुन जाणार असल्याने तीन ऑगस्ट शनिवारी सकाळी ११. वाजता कळंब तालुका महाराट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
संवाद यात्रा पोस्टर प्रकाशनावेळी संघाचे माजी राज्य प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जाधवर,कळंब तालुका अध्यक्ष दीपक बारकुल, येरमाळ्यातील पत्रकार सचिन बारकुल,दत्ता बारकुल दत्ता गायके,सुधीर लोमटे,सुखदेव गायके, ऍड.मिलिंद देशमुख,संतोष बारकुल,बालाजी बारकुल,तानाजी बारकुल,कल्लेश भोसले पत्रकार उपस्थित होते.
तीन ऑगस्ट रोजी येरमाळा येथे येणाऱ्या संवाद यात्रेच्या स्वागत समारंभा साठी कळंब तालुक्यातील प्रिंट मीडिया, पोर्टल,युट्युब डिजिटल मिडीयाच्या सर्व पत्रकारांनी सोलापूर धुळे महामार्गवरील छत्रपती शिवाजी उड्डाणपुल या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन संघांचे प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जाधवर व कळंब तालुका अध्यक्ष दीपक बारकुल यांनी केले आहे.