महिला उद्योजिका संघ” या अंतर्गत मुलींची उद्योग शाळा आणि महिला उद्योजिका सदस्य नोंदणीसाठी लासोना येथील महिलांनी घेतला उस्फूर्तपणे पुढाकार

तेरणा काठ न्युज
*महिला उद्योजिका संघ अंतर्गत सुरू असलेल्या मुलींची उद्योग शाळा आणि महिला उद्योजिका सदस्य नोंदणी उपक्रमास महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून पुढाकार घेतलेला आहे. संस्थापक पांडुरंग घोडके यांनी उद्योजिका म्हणून ज्यांना सदस्य व्हायचे आहे त्यांच्याकडून व्यवसायाबद्दल प्रतिक्रिया आणि अडचणी जाणून घेतल्या. तसेच ग्रामीण भागात कोणकोणते व्यवसाय करता येऊ शकतात याबद्दल चर्चा केली.तसेच त्यांना बचतगट स्थापना करणे,कर्ज प्रक्रिया,आणि विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या अनेक योजनांची माहिती सांगितली..
दि.27.07.2024 रोजी झालेल्या बैठकीत “महिला उद्योजिका संघ” अंतर्गत काही महिलांना सदस्य करून घेण्यात आले.तसेच ज्या महिला व्यवसाय करतात त्यांना कोणकोणत्या व्यवसायाची गावात गरज आहे.तसेच व्यवसायासाठी उद्योजिका म्हणून नोंदणी करण्यासाठी किती कुटुंबाचा सर्व्हे करू शकतात याबद्दल चर्चा केली..तसेच किशोरवयीन मुलींची निवड करून त्यांच्यासाठी उद्योग शाळा सुरू करून त्या माध्यमातून मुलींना व्यावहारिक व व्यावसायिक ज्ञान देण्यासाठी कार्यशाळा घेण्या बद्दल मार्गदर्शन केले.याशिवाय ज्यांना सदस्य होण्यासाठी फॉर्म भरायचा आहे त्यांना खालील लिंक गुगलवर भरायला सांगितले…
https://forms.gle/FQpY1ieQqu38KorZ7
या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे..