जनहित पतसंस्थेला सलग तिसऱ्यांदा दिपस्तंभ पुरस्कारचे वितरण

तेरणा काठ न्युज
येरमाळा येथील २००५ मध्ये स्थापन झालेली जनहीत पतसंस्था गेल्या २० वर्षापासून बॅकींक क्षेत्रात कार्यरत आहे स्थापनेपासुन ही सस्था सतत २० वर्षा पासुन नफ्यात आहे यांचा ऑडीट वर्ग अ आहे याशिवाय सीडीरेशु ८५ टक्के आहे व एनपीए ०५ टक्के आहे आहे
संस्था व्यवसायिक ,गरजवंत छोटे व्यापारी दुध उत्पादक कारागीर महिला बचतगट सोनेतारण कर्ज मॉडीगेज कर्ज पिग्मीतारण कर्ज देऊन या पंचक्रोशीत बॅकिंग सेवा देत आहे याशिवाय महावितरण कंपनीचे अधिकृत विजभरणा केंद्र , २४ तास चालणारे एटीएम मशिन आहेत लॉकर सुविधा मोबाईल बॅकिंग आरटीजीएस एन ई एक टी मोफत सेवा देत आहे याशिवाय आय एसओ मानांकन प्राप्त पतसस्था असून वार्षिक उलाढाल १५० कोटी रुपयांची आहे याशिवाय सामाजीक व आर्थिक शिस्त लावण्याचे मोठे कार्य हि संस्था करीत आहे यामुळे महाराष्ट्र राज्य पतसस्था फेडरेशन मुंबईने या सर्व कार्याची व निकषाची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर विभागातून १० कोटी ते ३० कोटी गटातून प्रथम क्रमांकाचा सहकार क्षेत्रातील अतिशय महत्वाचा व प्रतिष्ठीत समजला जाणारा दिपस्तभ पुरस्कार फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश (काकासाहेब ) कोयटे कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलींद काळे गोदावरी फाऊडेशनच्या अध्यक्षा सौ राजश्रीताई पाटील फेडरेशनच्या सिईओ सुरेखाताई लावंडे याच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक तथा सहकार भारतीचे धाराशिवजिल्हा अध्यक्ष तथा फेडरेशचे निमंत्रीत सदस्य प्रा संतोष तौर ॲड महेंद्र कासार संचालक गणेश मोरे गोवर्धन उगडे अभिजीत पाटील पवन ओव्हाळ यांनी स्विकारला हा शानदार कार्यक्रम तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसीटी येथे आयोजीत करण्यात आला होता
या यशाचे मानकरी ठेवीदार कर्जदार पिग्मीधारक आरडी खातेदार ,सभासद, पंचक्रोशीतील गावकरी असल्याचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी सांगीतले.