ताज्या घडामोडी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हा वृंदावन फाऊंडेशनचा उपक्रम अनुकरणीय-प्राचार्य सतिश मातने

वृंदावन फाऊंडेशन पुणे व संत ज्ञानेश्वर महाराज बालकाश्रम कळंब च्या वतीने पाथर्डी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

तेरणा काठ न्युज 

कळंब -वृंदावन फाउंडेशनने जो शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे तो अनुकरणीय असून तो स्तुत्य असल्याचे मत भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य तथा राजकीय कट्टाचे संपादक सतिश मातने यांनी व्यक्त केले.ते वृंदावन फाऊंडेशन पुणे व संत ज्ञानेश्वर महाराज बालकाश्रम कळंब यांच्या वतीने कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे चित्रकला किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.महादेव महाराज आडसुळ हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सतिश टोणगे,स्व.गणपतराव कथले आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब कथले, व्हाईस ऑफ मिडियाचे चेतन कात्रे,मराठी पत्रकार संघाचे प्रा.विलास मुळीक, नमस्ते धाराशिवचे संपादक संदिप कोकाटे,ह.भ.प.पिंगळे महाराज,समाजसेवक बंडु ताटे,यश सुराणा, पाथर्डीचे सरपंच नानासाहेब पिंगळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अंजली जाधव, पोलिस पाटील बालाजी चिंचकर , जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित देशमुख, मयुर पिंगळे,मनोज पिंगळे इत्यादी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्राचार्य सतिश मातने यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळा याच खऱ्या अर्थाने शिक्षणाचा कणा असून तिथून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकणारे विद्यार्थी भविष्यात मोठ्या पदावर बसलेले देखील आपण पाहिले आहे त्या शाळेत वृंदावन फाउंडेशन ने चित्रकला किट वाटप व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करून अनुकरणीय काम केल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना हभप महादेव महाराज आडसुळ यांनी भारताची संस्कृती व शिक्षण तसेच आईवडील हेच पहिले गुरू आहेत या बाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने तर समारोप राष्ट्रगीताने झाला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड तर धनंजय गव्हाणे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी सहशिक्षिका मनिषा पवार, सरोजिनी पोते, सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.