ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा राज्यकारभार आर्दशवत ;; प्रा.सोमनाथ लांडगे

तेरणा काठ न्युज
येरमाळा प्रतिनिधी —
शिवाजी महाराजांनंतर लोककल्याणकारी सुराज्य चालवून दाखवलं ते अहिल्यादेवी होळकर यांनीच ,असं प्रतिपादन प्रा.सोमनाथ लांडगे यांनी ज्ञानोद्योग कनिष्ठ महाविद्यालयांत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २२९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी बोलताना केले
या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्रा.विजयकुमार शिंदे होते तर प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी सरपंच मंदाकिनी बारकुल, उद्योजक विजय देशमुख , गणेश मोरे, पत्रकार दत्तात्रय गायके, सोमनाथ बारकुल, सुखदेव गायके,यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रा.लांडगे म्हणाले की, शिवाजी महाराजांनंतर लोककल्याणकारी सुराज्य चालवून दाखवलं ते अहिल्यादेवी होळकर यांनीच.सामाजिक कार्यासोबत न्यायप्रिय व धार्मिक स्थळांचा उध्दार केला आहे.अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनक्रमातील घडामोडी याचा ऊहापोह केला, प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी बोलताना म्हणाले की,अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर मोठ्या प्रमाणात व्हावे यामुळे . आधुनिक पिढीला या महापुरुषांची चरित्र व कार्य समजतील आता अशा महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन महाविद्यालयीन युवक घडला पाहिजे,कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . विनोद बारकुल व सूत्रसंचालन प्रा, सुनील पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.महादेव फुगारे ,प्रा.कैलास जाधव, प्रा. विनोद बारकूल, प्रा. हनुमंत कोकाटे, प्रा. सयाजी बारकुल, प्रा, अनिकेत बारकुल, अजित बारकुल सज्जन लोंढे, रणजीत कवडे, बाबासाहेब बारकुल यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा, सुनील पाटील यांनी केले तर शेवटी आभार प्रा, कैलास जाधव यांनी मानले.
.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.