निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाला फसवून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा

तेरणा काठ न्युज
छत्रपती संभाजीनगर येथे प्रादेशिक जलसंधारण कार्यालय समोर जिल्हा जलसंधारण अधिकारी धाराशिव,उपअभियंता,जलसंधारण अधिकारी,शाखा अभियंता संबंधित ठेकेदार,यांनी कळंब तालुक्यामध्ये, सिमेंट बंधारे,पाझर तलाव दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची करून शासनाला फसवून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. व जोपर्यंत संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण स्थगित करणार नाही.या मागणीसाठी मौजे एकुरका ता कळंब जि धाराशिव येथील माजी सरपंच श्री गौतम भीमराव धावरे,यांनी प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.यावेळी त्यांच्या सबोत,मनोज सरोन,गणेश साळवे,राजाभाऊ राऊत,राजाभाऊ गायकवाड,बाबासाहेब ओव्हाळ, यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते