साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेरा कार्यकर्त्यांचा सन्मान

तेरणा काठ न्युज
कळंब तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ समाजसेवक,युवा समाजसेवक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा महाराष्ट्रात प्रथमच लहुजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
कळंब येथील सुरमई मंगल कार्यालयात ,आयोजक लहुजी शक्ती सेना आणि श्री लक्ष्मी सामाजिक सेवाभावी संस्था हासेगाव (शी ), डॉ. सरोजिनीताई संतोष राऊत आणि लहुजी शक्ती सेनेचे राज्य महासचिव बालाजी गायकवाड यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला, त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मातंग समाजाचे हृदय सम्राट लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक,अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे आणि आ.अमितजी गोरखे शिवसेना समन्वयक ॲड .वैजनाथ वाघमारे आडसकर यांच्या उपस्थितीमध्ये तेरा मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी समाजा मध्ये नवचैतन्य उभारून सामाजिक कार्य जोमाने करावे म्हणून पुरस्काराच्या स्वरूपाने पाठीवर टाकलेली थाप या मुळे कार्यकर्त्याला नवीन ऊर्जा मिळते व त्यांचा आदर्श घेऊन नवीन कार्यकर्ते ने जोमाने कामाला सुरुवात करून समाजातल्या वंचित घटकाला न्याय मिळवून नवीन कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी “लहुजी रत्न पुरस्काराचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त राबविण्यात आला हा उपक्रम राबविल्यामुळे लहुजी शक्ती सेना महासचिव बालाजी गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे,
कुंदन कांबळे यांचे मनोगत
लहुजी शक्ती सेनेने माझ्या कार्याची दखल घेत
मला ” लहुजी रत्न पुरस्कार 2024 प्रदान “केल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आपल्याला पुढील कार्यास शुभेच्छा देतो.