ताज्या घडामोडी

येरमाळा येथे बकरी ईद उत्साहात साजरी

तेरणा काठ वृत्तसेवा –येरमाळा.येथील सर्व मुस्लिम बांधव गावाबाहेरील ईदगाह वरती सकाळी 8=30.वा. बकरी ईद निमित्ता ने नमाज अदा केली.येरमाळा गावासह परीसरातील मलकापुर, उपळाई, पिपळवाडी, पांनगाव, या गावातून जवळपास 300 मुस्लिम बांधवानी जामा मस्जिद चे मौलवी मखदुम शेख यांच्या मागे नमाज अदा केली.आपला देशाविषयी  प्रेम, व भारतातील प्रतेक व्यक्ति हा आपल्या देशप्रेमा विषयीजागृत असला पाहिजे. प्रतेकानी एकामेका विषयी आदर केला पाहिजे. अशीही या वेळी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी दर वर्षा प्रमाणे येरमाळा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव व  पोलिस कर्मचारी यांनी ईदगाह वरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगल्या पद्धतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रार्थना झाल्यानंतर मुस्लिम बांधवानी एक दुसऱ्यांना गळा भेट देवून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.