येरमाळा व परिसरातील मुलामुलींनी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा

तेरणा काठ न्युज
येरमाळा येथे खास गणेश उत्सवानिमित्त दिनांक 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2024 पर्यंत बाजार चौक खंडोबा मंदिर याठिकाणी विविध विषयावरती तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत
येरमाळा येथील श्री नृसिंह गणेश मंडळांनी हे प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे या गणेश मंडळांनी वेगळी ओळख निर्माण केली असून यावर्षी या स्पर्धात्मक युगात युवक युवतींना स्पर्धा परीक्षा मध्ये येणाऱ्या अडचणी व त्याविषयी माहिती व विषयावार अभ्यासक्रमाचे शिक्षण यावर तज्ञ मार्गदर्शनाकडून मार्गदर्शन देण्यात येणार आहे. व दिलेल्या मार्गदर्शनानुसार 15 सप्टेंबर रोजी परिक्षा घेतली जाईल व यामध्ये प्रथम, व्दितीय,व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याचे नरसिंह गणेश मंडळाचे अमोल बारकुल, लहू बारकुल . तेजस बारकुल ,
देवानंद बारकुल,. बालाजी जाधव, कुलदिप बारकुल
. दिपक बारकुल , लखन मोरे ,. प्रसाद बारकुल ,रामेश्वर चौधरी, अल्ताफ पठाण, अतिश बारकुल,विशाल बारकुल यांच्याकडून सांगण्यात आले आहे तरी या आर्दश उपक्रमात मोठ्या संख्येने गावातील व परिसरातील मुलामुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.