कोहळ्याच्या पुर्णाहुतीने नवरात्र महोत्सवाची सांगता

येडेश्वरी देवीचा नवरात्र उत्सवातील होमहवन पूजेत कोहळ्याचे होमहवन करण्यात आले व नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली.
नवरात्र महोत्सवात नवरात्रीच्या उपवास नंतर होमहवनात कोहळ्याची पूर्ण आहुती मानकरी अमोल पाटील,यशवंत पाटील, दत्तात्रय बोधले महाराज, सुनीलपाटील,देवस्थानचे अध्यक्ष बापु बेदरे यांच्या हस्ते देण्यात आली नंतर पुरणपोळी कडकण्याचा नेवैद्य वाढवण्यात येऊन घटोत्थापन करण्यात आले. भाविकांच्या व आई राजा उदो उदो च्या जयघोषानै मंदीर परिसर गजबुजुन गेला होता. दि.१२ अश्र्विन शुध्द महाअष्टमीला उत्तररात्री होमहवन पूजेला प्रारंभ करण्यात आला यावेळी देवीची बखाड्या लिंबाच्या पञीच्या पानाने देवीच्या तांदळावर बारवाची महापुजा मांडण्यात आली होती. पहाटे ६ वा सुर्योदय समयी विधिवत महापुजा,महायज्ञ करण्यात आले व होमामध्ये कोहळ्याची पुर्णाहुती देण्यात येऊन देवीच्या मंदीरातील घटोत्थापन करण्यात आले.यावेळी देवीस पुरणपोळी नैवैद्यासह कडकणे नैवैद्य वाढवण्यात आला. यावेळी सर्वञ आई राजा उदो उदो च्या जयघोषाने मंदीर परीसर दुमदुमुन गेला होता.यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.