पाथर्डी जिल्हा परिषद शाळेत जागर स्त्री शक्तीचा सन्मान कर्तुत्वाचा कार्यक्रम

तेरणा काठ न्युज
कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली जागर स्त्रीशक्तीचा सन्मान कर्तुत्वाचा हा कार्यक्रम घेण्यात जातो. सदरील कार्यक्रमांमध्ये स्त्री शक्तीच्या व त्यांच्या महान कार्याचा कर्तुत्वाचा सन्मान केला जातो दररोज एक याप्रमाणे राष्ट्र उभारणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या रणरागिणी पराक्रमी स्त्रियांची यशोगाथा सादर केली जाते.
यामध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राणी लक्ष्मीबाई, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ,वैज्ञानिक कल्पना चावला, खेळाडू पी टी उषा,ज्येष्ठ समाजसेविका मदर तेरेसा यांच्या कार्याची माहिती सादर केली जाते. तसेच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक सामाजिक व ऐतिहासिक गोष्टीमध्ये स्त्रियांच्या महान कार्याची जाणीव व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण होते व वक्तृत्व कलेची आवड निर्माण होते.नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दांडिया ,गरबा हा कार्यक्रम देखील सादर केला जातो या कार्यक्रमासाठी शिक्षक धनंजय गव्हाणे,मनीषा पवार,सरोजनी पोते, सुरेखा भावले यांनी विशेष परिश्रम घेतले.