ताज्या घडामोडी

श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पर्वणी येरमाळा येथे श्री दत्तगुरू देवाची प्रतिष्ठापना

तेरणा काठ वृत्तसेवा
हिंदू धर्मातील गुरुपरंपरेतील श्री दत्त देवाच्या मूर्तीची मंदिर उभारणी करून मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी वार गुरुवार रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली
येरमाळा येथील श्री येडेश्वरी मार्गावर सुरेश बारकुल याची शेती असून ते पहिल्यापासूनच श्री दत्त गुरु भक्त आहेत. त्यांची श्री दत्तगुरू देवावर असीम भक्ती असून ते श्रीदत्त देवाचे दुसरे रूप असणारे श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गाणगापूर या तीर्थक्षेत्री दर्शनासाठी सातत्याने जातात. शारिरीक त्रासामुळे एवढ्या लांबचा प्रवास करण्यासाठी त्यांना अडचणी येत होत्या व आपणच श्रीगुरुंचे मंदिर उभं करावं अशी अनेक दिवसांपासून त्यांची मनोमन इच्छा होती.या सर्व गोष्टींचा विचार त्यांची मुलं तेजस बारकुल व औंदबर बारकुल यांनी केला व खर्चाचा कसलाही विचार न करता मंदिर उभारणी करायचे ठरवून मंदिर बांधकाम केले,व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार दिवसाचं औचित्य साधून श्री दत्त देवाच्या मूर्तीची विधिवत मंत्रौपच्चार व धार्मिक विधी पुजन करून दत्तगुरू देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी गावातील भक्तगण व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.