ताज्या घडामोडी
तेरखेडा शिवारात धावत्या टेम्पो ट्रॅव्हल्सवर चढून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

तेरणा काठ वृत्तसेवा
येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-विकास भागवत खडके, वय42 वर्षे, रा. 401 ई विंग मयुन नेचर ग्लोरी फेज 1 पारसीक नगर कळवा ता. जि. ठाणे हे व त्यांचे नातेवाईक असे टॅम्पो ट्रॅव्हल्स मधून छत्रपती संभाजीनगर येथुन तुळजापूर कडे जात असताना दि.26.12.2024 रोजी 23.00ते 23.30 वा. सु. तेरखेडा शिवारातील बोरी पेट्रोल पंप ते तेरखेडा येथे अज्ञात व्यक्तीने टॅम्पो ट्रॅव्हलचे पाठीमागील शिडीवार चढुन दरवाज्याचे कुलूप तोडून डिग्गीतील 3 बॅगा मधील 23 तोळे सोन्याचे दागिने व कपडे असा एकुण 6,34,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विकास खडके यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.