ताज्या घडामोडी

कळंब येथे रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

तेरणा काठ वृत्तसेवा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे आरटीओ कॅम्प दरम्यान  .उपप्रादेषिक परिवहन अधिकारी धाराशिव हर्षल डाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक सिध्देश्वर मस्के यांनी कळंब येथे रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमात, त्यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले आणि सुरक्षित वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान, हेल्मेट आणि सीट बेल्टच्या वापराचे महत्त्व, वेग मर्यादांचे पालन, मद्यपान करून वाहन चालवण्याचे दुष्परिणाम याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

सिध्देश्वर मस्के यांनी उपस्थितांना रस्ता अपघातांच्या वाढत्या घटनांबद्दल जागरूक केले आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार असल्याचे मस्के यांनी सांगितले, ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षित वाहन चालवण्याबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल. यावेळी नागरीकांना रस्ता सुरक्षेतेची शपथ देण्यात आली. यावेळी संतोष कोळी श्री सद्गुरू मोटार ड्रायव्हिंग स्कूल, अन्सार रझवी खमर मोटार ड्रायव्हिंग स्कूल रफिक सौदागर ड्रायव्हिंग स्कूल रवी लोकरे बालाजी ओझा बाळासाहेब भोईटे ,यासह नागरिक,वाहन चालक उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.