ताज्या घडामोडी

येडाई व्यसनमुक्ती केंद्रात जिजाऊ जयंती साजरी

तेरणा काठ वृत्तसेवा 

येरमाळा येथील यश मेडिकल फाउंडेशन संचलित येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राच्या संचालिका डॉ पल्लवी तांबारे समुपदेशक प्रियंका शिंदे परिचारिका कविता तांबारे कल्पना कोठावळे अलका मोरे विजया कांबळे शोभा कांबळे पूजा चौधरी राधा तांबारे या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले   सामुपदेशिका प्रियंका शिंदे  यांनी केले प्रास्ताविकात बोलताना त्यांनी,जिजाऊ मासाहेब यांच्या कार्याला उजाळा दिला त्यामध्ये असे उद्गगार काढले की विखुरलेले देश बांधवांना एकतेच्या सूत्रात बांधून स्वराज्याचे जन आंदोलन उभारणे तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणे व हिंदवी स्वराज्याची प्रेरिका म्हणून कार्य करणे या सर्व कार्यांना उजाळा दिला व तशी प्रेरणा सर्वांनी जागृत करावी व युवकांनी व्यसनापासून दूर राहावे असे आपले मत व्यक्त केले तसेच जिजाऊ चरित्र पुस्तकाचे वाचन, वक्तृत्व स्पर्धा असे विविध उपक्रम जयंतीनिमित्त राबवण्यात आले सर्व कर्मचाऱ्यांनी व परिवर्तनवादी मित्र यांनी देखील राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपापली मनोगत  व्यक्त केली  शेवटी  येडाई व्यसनमुक्ती केंद्राची संचालक डॉ .संदीप तांबारे आभार मानत असताना राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचे विज्ञानवादी दृष्टीकोन हा सर्वांच्या लक्षात आणून दिला व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे विशेष आभार मानले हा कार्यक्रम व्यवस्थितेसाठी येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे मॅनेजर बापूराव हुलुळे प्रकल्प समन्वयक गणपत सिंग परदेशी समुपदेशक नानासाहेब देशमुख सुजित ढेकळे युवराज पडवळ सुरज जाधव तसेच इतर सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम व्यवस्थित त्या पार पाडण्यासाठी साठी अथक परिश्रम घेतले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.