येरमाळा येथे शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद

तेरणा काठ वृत्तसेवा –20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी येरमाळा मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प कुमारी शिवलीला ताई पाटील यांचे सुश्राव्य असे किर्तन आयोजित करण्यात आले येरमाळ्यातील सर्व महिलांनी कीर्तनास उदंड असा प्रतिसाद दिला किर्तन सेवेमध्ये अतिशय मार्मिक शब्दांमध्ये समाजातील वास्तव स्थिती व शिव विचार आत्मसात करण्यासंदर्भात आपल्या गोड वाणीतून शिव विचार प्रकट केले. शिवलीलाताई पाटील यांनी सर्व श्रोत्यांची मने जिंकली यासोबतच येरमाळा नगरीतील ज्येष्ठ अठरापगड जातीतील समाजसेवकांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्ष प्रवीण बारकुल उपाध्यक्ष आतिश बारकुल रामेश्वर चौधरी गोरख बारकुल तेजस बारकुल अमोल बारकुल लहू बारकुल काकासाहेब बारकुल प्रितेश बारकुल येरमाळा बहुउद्देशीय पत्रकार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन बारकुल, बालाजी रमेश बारकुल सुधीर लोमटे, दत्ता बारकुल सुखदेव गायके दत्तात्रय गायके यांच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवकांचा शिवमुर्ती व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सुभाष तात्या पाटील, बब्रुवान बारकुल ,सोमनाथ आप्पा बारस्कर रेवन आप्पा घेवारे ,बबन पलंगे ,महादेव जावळे सुखानंद स्वामी, भगवान उघडे, मुरारी कांबळे, उत्तरेश्वर कांबळे ,गफ्फार शेख, जब्बार पठाण, दशरथ उघडे, सखाराम मोरे, भारत भालेकर ,संतोष जमदाडे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला..