ताज्या घडामोडी

येरमाळा पोलीस ठाण्याचे एपीआय क्षिरसागर यांची बदली तर तुळजापूरहून आलेले नविन पोलीस अधिकारी रुजू

तेरणा काठ वृत्तसेवा –पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे कारभारी यांच्यांत खांदेपालट केली आहे यामध्ये येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शिरसागर यांच्या जागी तुळजापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्या भालेराव यांना संधी दिली आहे.
अख्ख्या महाराष्ट्रात नवसाला पावणारी देवी म्हणून सुप्रसिद्ध असणारी येरमाळ्याची श्री येडेश्वरी देवी हिची चैत्र पौर्णिमेची यात्रा वीस लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत पार पडते. या यात्रेत अठरा पगड जातीची जनता असल्याने यामध्ये हौशे,नवसे, गवशे अशा प्रकारच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने यामध्ये पोलिस यंत्रणेचा रोल हा महत्त्वाचा ठरतो, तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविक शेतामध्ये मोठ्या प्रमाणात राहतात त्यामुळे चोरटेही त्याच पटीत सक्रिय असतात निश्चितच पोलिसांची जबाबदारी वाढते. आता ही सर्व जबाबदारी येणाऱ्या नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव यांच्यावर असणार आहे.
श्री येडेश्वरी मंदिरावर चालत असलेल्या दोन नंबर व्यवसायावर प्रभुत्व मिळवण्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शिरसागर यांना चांगले यश आले होते त्यामुळे श्री येडेश्वरी देवी मंदिरा आलेला भाविक हा दर्शन घेऊन सुखा समाधानाने माघारी जात आहे. सर्व दोन नंबर व्यवसाय करणारे टेबल बंद झाल्याने भाविकांची होणारी लूट मोठ्या प्रमाणात थांबली. याचे सर्व श्रेय महेश शिरसागर यांना जाते त्यांनी हे मिशन अगदी यशस्वीपणे आणि समर्थपणे राबविल्याने भाविक वर्गात व परिसरातील व्यवसायिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आता ही जबाबदारी आलेल्या नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव यांच्यावर असणार आहे.

येरमाळा हे गाव चौरस्त्यावर असल्यामुळे दोन हायवे या गावातून जातात त्यामुळे रस्त्यावरील रोडराॅबरीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होते ,तेही काही प्रमाणात कमी करण्यात एपीआय शिरसागर यांना यश मिळालेले दिसते .एकंदरीत एपीआय शिरसागर यांनी येरमाळा पोलीस स्टेशनचा कारभार चांगल्या रीतीने चालवल्याचे दिसते आता ही सर्व जबाबदारी येणारे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव यांच्यावर पडणार आहे. तसेच राज्यातील नामांकित यात्रेपैकी येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची यात्रा लवकरच येणार असल्याने ही ही मोठी जबाबदारी एपीआय भालेराव हे कसे पेलतील हा येणारा काळच ठरवेल.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.