येरमाळा येथे श्री येडेश्वरी संगीत क्लासेस मध्ये गुणवंतांचा सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा
श्री येडेश्वरी संगीत क्लासेस येरमाळा येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त संगीत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला
कै. रावसाहेब थोरबोले स्मृती वाचनालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुखानंद स्वामी जंगम महाराज होते तर अंकुश पाटील , सुरेश साहेबराव बारकुल , समाधान बेदरे, बालाजी रमेश बारकुल, अमोल बारकुल व येडेश्वरी संगीत क्लासेसचे संचालक शशिकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती
सर्वप्रथम संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पवार सरांनी संगीताचे महत्व व त्याचा आपल्या जीवनातील होणारा उपयोग तसेच तणावमुक्त जीवनासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं साधन म्हणजे संगीत आराधना असे म्हणाले यावेळी संगीत विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी पेटी वादन पारंगत धनश्री बालाजी बारकुल,रोशनी औदुंबर बारकुल,श्रेया सोमनाथ बेदरे,प्रांजल अमोल बारकुल,तबला वादक प्रज्वल अमोल बारकुल यांनी उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र भेटवस्तू देऊन यांना गौरविण्यात आले.मान्यवरांनी येरमाळ्यात संगीत शिक्षण प्रसार व त्याची गरज या संदर्भात मतं व्यक्त केली,कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल बारकुल यांनी केले तर आभार समाधान बेंद्रे यांनी मानले.