येडाई यात्रा महोत्सवात येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी यंत्रणा सज्ज

तेरणा काठ वृत्तसेवा
येरमाळ्याची येडाई ही नवसाला पावणारी देवी म्हणून महाराष्ट्रसह राज्यासह परराज्यात ही परिचित असल्याने देवीची चैत्र यात्रा ही लाखो भाविकांच्या संख्येने भरते यांच्या सेवेसाठी सर्व विभागाच्या यंत्रणा सज्ज झाल्या असल्या तरी बांधकाम विभागाने मात्र रस्त्याचे काम अर्धवटच ठेवल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात परेशानी होत आहे. तर शासकीय स्तरावरून वाढत्या भाविकांच्या संख्येचा विचार करून शाश्वत आर्थिक तरतूद होणे गरजेचे आहे.
मराठी वर्षातील चैत्र महिन्याची पोर्णिमा यात वसंत ऋतूत यात्रा भरते श्री येडेश्वरी देवीची अत्यंत उत्साहाच्या वातावरणात 18 पगड जाती व बहुजनांची यात्रा म्हणून प्रसिद्ध असणारी येडाईची यात्रा ही सर्वसामान्यांसाठी चांगली पर्वणी आहे या यात्रेत चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या वेळी देवीच्या पालखीवर लाखो भावीक चुन्याचे पाच खडे व पुरणपोळीचा नैवेद्य वाहतात व
आपली जी इच्छा असेल ती देवीस मागतात.
भाविकांच्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व कामे ग्रामपंचायत कडून केली जातात. तर देवस्थान ट्रस्टवरही काही जबाबदारी टाकलेली असते मंदिरावरील सर्व कामे देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले जातात व गाव जत्रेतील सर्व कामे ग्रामपंचायत कडून केली जातात. या सेवा पुरवण्यासाठी शासकीय स्तरावरून यात्रानिधीची कसलीही आर्थिक तरतूद नसल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरच व्यवसायिकांच्या करातून जी रक्कम गोळा केली जाते त्यातूनच खर्च भागवला जातो शासकीय स्तरावर विशेष आर्थिक तरतूद या यात्रेसाठी नाही तरी ही तरतूद व्हावी जेणेकरून येणाऱ्या काळात व वाढत्या भाविकांच्या संख्येचा विचार करून शासनाने याचा विचार करावा अशी मागणी आहे