ताज्या घडामोडी

खा.ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान

तेरणा काठ वृत्तसेवा;;;  धाराशिव येथील किंग्ज गार्डन  येथे दिनांक 29.4.2025 रोजी व्यसनमुक्ती कार्यशाळा हा कार्यक्रम घेण्यात आला

या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्ह्याचे खा. ओमराजे निंबाळकर हे अध्यक्षस्थानी होते. तसेच डॉ. संदीप माणिकराव तांबारे,  येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका पल्लवी तांबारे येडाई ,ऑरगॅनिक फूड शॉप आंदोरा सीईओ सुमन माणिकराव तांबारे.येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर डॉ प्रवीण दिवाने, आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र जामगाव चे डॉक्टर केडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे यांनी केले तसेच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरबोलताना म्हणाले की, व्यसनच करायचं असेल तर व्यायामाचे करा पुस्तक वाचण्याचे करा व विविध छंद जोपासण्याचे करा ज्यातून आपली समाधान व आनंद मिळेल अशा गोष्टीचे व्यसन करा.  या कार्यक्रमासाठी येडाई व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व कर्मचारी तसेच आयुष्य मुक्ती केंद्रातील सर्व कर्मचारी व येडेश्वरी हॉस्पिटल येरमाळा,  विविध क्षेत्रात कार्यरत असणारे समाजसेवक हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाची चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम व्यवस्थित त्या पार पडावा यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये झुंबा वर्क आउट व्यसनमुक्तीपर,नृत्य , व्यसनमुक्ती पथनाट्य ,व्यसनमुक्तीपर गायन, व्याख्यान व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशिका मृणालिनी मोरे यांनी केले. आभार येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणपतसिंग परदेशी यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी  बापूराव हुलुळे, सुजित ढेकळे, राजेश तामाने सुरज जाधव ,नानासाहेब देशमुख,अतुल चौधरी  यांनी अथक परिश्रम घेतले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.