ताज्या घडामोडी

दहिफळ येथील बाजार मैदानातील अतिक्रमण हाठवले

तेरणा काठ वृत्तसेवा –दहिफळ प्रतिनिधी-योगराज पांचाळ

कळंब तालुक्यातील दहिफळ येथील बाजार मैदानातील अतिक्रमणाचा विषय अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत होता.दि.३० मे रोजी अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात झाली.बाजार मैदानावर अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय करत होते.अतिक्रम काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आली होती.खंडोबा मंदिर परिसरात झालेले अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी खंडोबा भक्तांनी केली होती.अतिक्रम काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयाला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते.आदेशाचे पालन करत ग्रामपंचायतने अतिक्रमण परिसरात मोजणी करून संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली होती.जवळपास दीड वर्षापासून हे प्रकरण सुरू होते.
गट नंबर १८८ वरील खंडोबा मंदिर परिसरातील अतिक्रमण हाठवण्यासाठी खंडोबा भक्तांनी जिल्हाधिकारी यांना दि २६ मे २०२५ रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.याची तात्काळ दखल घेत प्रशासन कामाला लागले.ग्रामसेवक व सरपंच यांनी बाजार मैदानातील अतिक्रमण धारक व निवासी अतिक्रमण धारक यांना नोटीस देऊन स्व मर्जीने पुढे येऊन अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी अतिक्रमण काढून घेतले.

जवळपास २५ व्यवसायीकांचा धंदा बंद झाला आहे.ऐन बाजार मैदानात दुकाणे असल्यामुळे चांगला व्यवसाय होत होता.अतिक्रमणाचा मुद्दा निघाल्यामुळे
स्थलांतरित व्हावे लागले.
अचानक अतिक्रमणाचा हातोडा पडल्यामुळे व्यवसायिकांत नाराजी व्यक्त होत आहे.निवासी अतिक्रमण पावसाळ्यात काढता येत नाही म्हणून ते पुढे ढकलण्यात आले आहे.

खंडोबा मंदिर परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे यात्रेला अडथळा निर्माण झाला होता. श्री खंडोबा देवस्थान जागृत देवस्थान आहे.भाविकांची गर्दी वाढत आहे.अतिक्रमणामुळे अनेक दुर्घटना झाल्या आहेत.खंडोबा भक्तांनी अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती.ग्रामपंचायतने आज कार्यवाही केली आहे.
यात्रेला अडथळा होणार नाही.तसेच व्यवसायिकांना चांगल्या प्रकारे नियोजन बद्ध गाळे काढून देणार आहोत.सर्वांनी सहकार्य केले.त्यांचा विचार आम्ही नक्की करू.
-सरपंच चरणेश्वर पाटील

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.