ताज्या घडामोडी
चालत्या गाडीतून ताडीपत्री फाडून दारुची चोरी

तेरणा काठ वृत्तसेवा : फिर्यादी नामे-विवेक कल्याण गायकवाड, वय 21 वर्षे, रा. सांगवी मार्डी ता. जि. धाराशिव यांचे दि. 01.06.2025 रोजी 07.10 ते 07.45 वा. सु.तेरखेडा येथील उत्तम हॉटेल जवळ वाहन क्र एमएच 13 ए.एल. 1419 मधील विदेशी दारुच्या बाटल्या व बॉक्स असे एकुण 24,100₹ किंमतीचा माल चालु वाहनाची मागील ताडीपत्री फाडून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विवेक गायकवाड यांनी दि.01.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(ब) गुन्हा नोंदवला आहे.