ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

तेरणा काठ वृत्तसेवा –येरमाळा येथील ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये लोकमाता पुण्यश्लोक धर्मरक्षिणी अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक पौळ एस. एल. यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले कि, अहिल्यादेवीनी ज्या पध्दतीने रह वर्ष राज्य केले त्याला जगाच्या पाठीवर कोठेही तोड नाही, राज्य करत असताना त्यांनी समाजहिताला प्राधान्य दिले. समाजातील समाजातील अनेवू अनिष्ठ • प्रश्रांना प्रथांना त्यांनी लगाम घातला. स्त्री-शिक्षण, विद्वान पुनर्विवाह स्त्रीयांची स्त्रीयांची लष्करी तुकडी तयार केली, अशा अनेक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातील देवळाचा जीर्णोद्धार त्यांनी स्वतःच्या खाजगी कोषातून केला हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपले जीवन खर्ची घातले. कार्यक्रमाचे प्रा. सयाजी बारकुल यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. विनोद बारकुल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा हनुमंत कोकाटे, दत्ता जेवे, प्रा. कळसे ,लाटे हरिश्चंद्र दत्ता जैन, अश्विनी चव्हाण बाबासाहेब, साबळे , शरद बारकुल, अविनाश जाधव, लोंढे बापू व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचान्यांनी परिश्रम घेतले