ताज्या घडामोडी

चौंडीत माजी मंत्री राम शिंदे यांची उपोषणस्थळी भेट

धनगर आरक्षणप्रश्नी शासनपातळीवर हालचाली सुरु

*जामखेड:* धनगर आरक्षण अमलबजावणी मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथील उपोषणस्थळी माजी मंत्री आ.राम शिंदे यांनी भेट देऊन विचारपूस केली. याप्रश्नी शासनपातळीवर हालचाली सुरु असून लवकरच ठोस निर्णय होण्याचे सूतोवाच आ.शिंदे यांनी यावेळी केले. दरम्यान धनगर आरक्षण अमलबजावणीची ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण थांबविणार नसल्याचा निर्धार यावेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी व्यक्त केला. यासंदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील म्हणाले, धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी व्हावी,ही मागणी घेऊन यशवंत सेनेने दोन महीन्यापूर्वी तब्बल एकवीस दिवसांचे आमरण उपोषण केले.ते उपोषण थांबविताना महाराष्ट्र सरकारने पन्नास दिवसांत अमलबजावणीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र या कालावधीत शासनाकडून काहीच कृती झाली नाही,त्यामुळे पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली.उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले आणि सुरेश बंडगर यांनी आज माजी मंत्री आ.राम शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्याचे सांगितले.तर आ.शिंदे यांनी धनगर आरक्षण अमलबजावणीच्या कार्यवाहीसंदर्भात शासनपातळीवर तातडीने हालचाली सुरु असून लवकरच सकारात्मक कृती झालेली दिसेल अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी उपोषणकर्ते यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील,प्रदेश सचिव नितीन धायगुडे, प्रदेश मिडीयाप्रमुख स्वप्निल मेमाणे समाधान पाटील,किरण धालपे,दत्ता काळे,संतोष कोल्हे,बाळा गायके, आदींसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.