ताज्या घडामोडी

एनक्युएएस या केंद्रीय पथकाने केले येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुल्यांकन

येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (एनक्युएएस ) कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय कमिटीच्या दोन मूल्यांकन अधिकारी यांनी भेटी देऊन पाहणी केली.या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक,आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (एनक्युएएस ) कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मूल्यांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे प्रथम उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,
मुल्यांकनाचा उद्देश चांगल्या कामगिरीच्या सुविधा ओळखणे , समुदायातील सार्वजनिक रुग्णालयांची विश्वासार्हता सुधारणे आहे.अशा पद्धतींच्या विशिष्ट आवश्यकता लक्षात घेऊन विकसित केली गेली आहेत. एनक्युएएस सध्या जिल्हा रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरासाठी उपलब्ध आहेत.मानके प्रामुख्याने प्रदात्यांना पूर्व परिभाषित मानकांद्वारे सुधारण्यासाठी त्यांच्या स्वतः च्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रमाणपत्रासाठी तशा त्यांच्या सुविधा आणण्यासाठी असतात.यातून झालेल्या मूल्यांकन तपासणी नंतर प्रमाणित करुन त्या त्या केंद्रांना मानके प्रदान केली जाणार आहेत
राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके कार्यक्रमा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आवश्यकते नुसार पुरवील्या जातात यातील बारकावे, सुविधा,सेवा,तपासून आरोग्य केंद्राना मानके दिली जातात यात “चिंतेची क्षेत्रे” सेवा तरतूद, हक्क,सहाय्य सेवा,क्लिनिकल केअर,संक्रमण नियंत्रण,गुणवत्ता व्यवस्थापन आणि आरोग परिणाम अंतर्गत विस्तृतपणे व्यवस्था केली जाते का याचे मूल्यांकन अधिकारी डॉ.गोविंद सिंघल,डॉ.अजय कुमार यांनी केले.
या कार्यक्रमातून मानके आयएसक्यूयुए मान्यताप्राप्त आहेत.आणि सर्वसमावेशकता, वस्तुनिष्ठता,पुरावे आणि विकासाच्या कठोरतेच्या दृष्टीने जागतिक मानदंड पूर्ण करतात.नंतर मानके प्रदान करतात.

येरमाळाआरोग्य केंद्रा अंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सेवा,संक्रमण काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजना,उपचार, केंद्रा अंतर्गत असणाऱ्या उपकेंद्रात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा,प्रसूती विभागाची माहिती, रुग्णालयातील विविध विभागाची कार्ये,सुविधा याची माहिती चित्राफिती द्वारे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन तेलप यांनी दिली.यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अतुल घोगरे , व्यसनमुक्ती केंद्रांचै संचालक डॉ.संदीप तांबारे किशोर तांदळे, जयराम शिंदे,सुनीता साळुंखे, किरण बारकूल, तसेच जिल्हा,तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी, उपास्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.