येरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूलचे पाच विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक

येरमाळा येथील विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षांचा अंतिम निकालात, विद्यानिकेतन शाळेचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले विद्यार्थी या प्रमाणे नंदिनी प्रमोद पाटील,सत्यम हनुमंत माळी,सुदर्शन रमेश लकडे,सिद्धांत मारुती बारकुल,प्रिया किरण मते,विद्यार्थ्यांच्या या यशासाठी एस आर जाधवर तसेच ओ एम खामकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शकांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेचे मार्गदर्शक टेकाळे, शाळेचे मुख्याध्यापक सानप तसेच सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.यावेळी शाळेचे संस्था अध्यक्ष सचिन पाटील म्हणाले की *शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला जातो शाळेतील तज्ञशिक्षिकामार्फत विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेतला जातो याही वर्षी शिष्यवृत्ती मध्ये अनेक विद्यार्थी धारक होतीलच.* शाळेचे संस्था अध्यक्ष सचिन पाटील व स्वाती पाटील यांनी सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.